Mini Olympic Competition | मिनी ऑलिंपिक स्पर्धेच्या निमित्ताने पुण्याचे क्रीडा वैभव देशपातळीवर पोहोचविण्याची संधी – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mini Olympic Competition | महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित करण्यात येत असलेल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेच्या (Mini Olympic Competition) निमित्ताने पुण्याचे क्रीडा वैभव आणि क्रीडा क्षेत्रातील ओळख देशपातळीवर पोहोचविण्याची संधी आहे, असे विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao) यांनी म्हटले. विधानभवन येथे महाराष्ट्र ऑलिंपिंक स्पर्धा आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 

बैठकीस क्रीडा आयुक्त सुहास दिवसे (Sports Commissioner Suhas Diwase), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh), महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर (Namdev Shirgaonkar), उपायुक्त नयना बोदार्डे (Naina Bodarde), उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर (Amrit Natekar), माहिती उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर (Dr. Purushottam Patodkar) उपस्थित होते.

 

सौरभ राव म्हणाले, महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन (Mini Olympic Competition) पुण्यासाठी गौरवाची बाब आहे. दोन दशकानंतर असे आयोजन पुण्यात होत आहे. यासोबत जी-20 बैठका आणि एटीपी टेनिस स्पर्धेचे देखील आयोजन नववर्षाच्या सुरुवातीला होत आहे. त्यामुळे स्पर्धा आयोजनाची चांगली तयारी करण्यासोबत पुण्याचे ब्रँडीगदेखील करण्यात यावे. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्तम क्रीडा कौशल्य पाहण्याची संधी असल्याने त्यांनाही आयोजनात सहभागी करून घ्यावे. स्पर्धेसाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी वाहतूक मार्शलची नेमणूक आवश्यक ठिकाणी करण्यात यावी. खेळाडूंना स्पर्धा कालावधीत आवश्यक आरोग्य सुविधा देण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात यावी. खेळाडूंची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.

क्रीडा आयुक्त सुहास दिवसे म्हणाले,
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा 2 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत पुणे येथे होत आहेत.
या स्पर्धेत 39 क्रीडा प्रकारांचा समावेश असून सुमारे 9 हजारापेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
राज्यात क्रीडा वातावरण निर्माण करणे, खेळाला उत्तेजना देणे, खेळाडूंना नैपुण्य दाखवण्याची संधी मिळावी हा या आयोजनामागचा उद्देश आहे.
बालेवाडी येथे 25, जळगाव-4, नाशिक-2, नागपूर-4, मुंबई-2, बारामती, एमआयटी, पुणे,
औरंगाबाद व पूना क्लब येथे प्रत्येकी 1 याप्रमाणे महाराष्ट्रात स्पर्धांचे आयोजन होईल.

 

महाराष्ट्र ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा जिल्हा आणि राज्यासाठी महत्वाच्या असून स्पर्धांसाठी प्रशासनाच्यावतीने आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी सांगितले.

 

Web Title :- Mini Olympic Competition | On the occasion of Mini Olympics, an opportunity to bring Pune’s sports glory to the national level – Divisional Commissioner Saurabh Rao

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Congress | हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन

Love Jihad Law | महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद कायदा’ होणार? देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात मोठे विधान

Winter Session 2022 | ठाकरे गटाला आणखी एक धक्का! विधानसभेच्या तालिका सभाध्यक्षांच्या यादीतून केले बेदखल…