EPFO अंतर्गत मिळणार्‍या पेन्शनमध्ये होऊ शकते 5 पट वाढ ! मोदी सरकार घेणार आठवड्याभरात निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निधी संघटनच्या एम्प्लॉय पेंशन स्कीम (EPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्प 2020 मध्ये खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन ईपीएसअंतर्गत किमान पेंशन रक्कम वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते. निर्मला सितारामन 1 फेब्रुवारी 2020 – 21 च्या अर्थसंकल्प सादर करतील. सरकार शनिवारी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करेल.

5,000 रुपये पेंशन करण्याचा प्रस्ताव –
कामगार संघटनेचे म्हणणे आहे की सरकार जेव्हा असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी आणि व्यापाऱ्यांना 3,000 रुपयांची पेंशन देण्याचा प्रस्ताव देऊ शकतात तर संघटीत क्षेत्राच्या कर्मचाऱ्यांना पेंशन देण्याचे कोणतेही कारण नाही. भारतीय मजदूर संघचे महासचिव ब्रजेश उपाध्याय म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारला ईपीएसअतंर्गत किमान पेंशन रक्कम 1,000 रुपयांवरुन 5,000 रुपये प्रतिमाह करण्याचे प्रस्ताव आहे. यावर्षाच्या अर्थसंकल्पात किमान पेंशन वाढवण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय संघर्ष समितीने 7,500 रुपये प्रतिमाह करण्याचा दिला प्रस्ताव –
राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत म्हणाले की आम्ही कामगार मंत्र्यांशी भेट घेऊन ईपीएसच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची किमान पेंशन वाढवून महागाई भत्यामध्ये 7,500 रुपये महिना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी दावा केला की कर्मचाऱ्यांचे किमान पेंशन वाढवल्याने सरकारवर अतिरिक्त ओझे पडणार नाही. यासंबंधित अहवाल त्यांनी कामगार मंत्र्यांनी सोपावला आहे. असंघटीत क्षेत्रात कर्मचाऱ्यांसाठी पीएम श्रम योगी मानधन योजना आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना चालवली जावी. दोन्ही योजनांमध्ये लाभार्थ्यांना 60 वर्षाच्या वयानंतर महिन्याला 3,000 – 3,000 रुपये मासिक पेंशनची व्यवस्था करण्यात आली आहे.

पेंशन कोष नियामकने बजटमध्ये नवी पेंशन प्रणाली एनपीएसमध्ये एक लाख रुपयांपर्यंत गुंतवणूकीत सूट दिली जाण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता व्यक्तिगत करदात्यांना आयकर कायद्यात कलम – 80 सीसीडी (1बी) च्या अंतर्गत एनपीएसवर 50,000 रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीवर अतिरिक्त लाभ मिळतो. यशिवाय पीएफआरडीएने अर्थमंत्रालयाकडून अटल पेंशन योजनेंतर्गत वयाची मर्यादा वाढवून 40 वरुन 60 करण्याचा आग्रह केला आहे. तसेच सध्याची पेंशन सीमा 5,000 रुपयांवरुन वाढवून 10,000 रुपये प्रति महिना करण्याची विंनती केली, अटल पेंशन योजना 18 ते 40 वर्षाचे लोक घेऊ शकतात.