मुंबईत 27 जानेवारीपासून ‘नाईट लाईफ’ सुरु, मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई आता 24 तास सुरु राहणार आहे. 27 जानेवारीपासून नाईट लाईफची अंमबलबजावणी मुंबईत होईल. या निर्णयाला राज्यमंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाईट लाईफवर विरोधकांकडून टीका होत आहे. नाईट लाईफमुळे निर्भयासारखे प्रकार आणखी वाढतील असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले होते. त्यानंतर या निर्णयाला मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली.

आदित्य ठाकरे यावर बोलताना म्हणाले की नाईट लाईफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे. पब आणि बारसाठी नवे नियम नाहीत, ते नेहमीप्रमाणे 1.30 वाजेपर्यंत खुले राहतील, त्यांच्यावरील वेळ मर्यादा कायम आहे.

नाईट लाईफमुळे मुंबई पोलिसांवर ताण येईल असे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे परंतु यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, नाईफ लाईफमुळे मुंबई पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही. 27 जानेवारीपासून नाईट लाईफची अंमलबजावणी होईल. यातून रोजगार निर्मितीसाठी देखील फायदा होईल.

कायदा आणि सुव्यवस्थेकडे तुम्ही कसे पाहतात यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले की पहिला टप्पा 27 तारखेपासून सुरु होईल. ज्यांना वाटेत की त्यांच्या व्यवसाय चांगला होऊ शकतो ते दुकान खुली ठेवतील. रात्री अपरात्री लोक मुंबईत येतात, त्यांच्या सुविधेचा विचार करुन ही सुविधा काही निवडक ठिकाणी सुरु करुन दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –