Budget 2021 : अर्थसंकल्पावरून मंत्री आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर टीका, म्हणाले – ‘बर्‍याच चांगल्या गोष्टी आहेत, पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 1) 2021-22 या वर्षांचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. दरम्यान पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्या राज्यांना अर्थसंकल्पात बरेच गिफ्ट मिळाले आहे. पण महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळाल आहे, हे शोधावे लागेल, अशी टीका त्यांनी केली आहे.

तसेच अर्थसंकल्पात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पण हायड्रोजन मिशन एअर पोल्युशनबाबत अर्थसंकल्पात काहीच नाही, अशी नाराजी ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला आहे.

सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. तसेच 75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ केला आहे. तसेच, भारत पेट्रोलियम, आयडीबीआय बँक आणि एअर इंडिया यात निर्गुंतवणूक करणार असल्याची घोषणा सीतारमन यांनी केली.