तुकाराम मुंढेंच्या बदलीवर ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्यांची सूचक प्रतिक्रिया ! म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई येथे सचिवपदी बदली करण्यात आली आहे. राज्याचे अपर सचिव सिताराम कुटे यांनी बुधवारी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या जागेवर आता राधाकृष्णन बी नागपुरचे नवीन मनपा आयुक्त असणार आहेत.

मुंढे यांची बदली झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक संतप्त प्रतिक्रिया येताना दिसल्या. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी देखील अवघ्या 4 शब्दात या बदलीवर आपलं मत मांडलं आहे. बदल्या करणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते. यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

तुकाराम मुंढे जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला नागपुरात रुजू झाले होते. अवघ्या 8 महिन्यात त्यांची मुंबईला बदली झाली आहे. त्यांची ही 8 महिन्यांची कारकीर्द अनेक अर्थानं वादळी राहिली आहे.

तुकाराम मुंढे यांची 15 वर्षात ही 14 वी बदली आहे. वर्षातून एकदा तरी त्यांची बदली होतच असते. नवी मुंबई, नाशिक महापालिका आयुक्त, जालना, सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे. भ्रष्टाचाराविरोधात लढणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत त्यांचे कायमच वाद होत आलेत. त्यांना कोरोना झालेला असतानाही त्यांची बदली केल्यानं आता टीका होताना दिसत आहे.

तुकाराम मुंढेंची कारकीर्द –

1) 2006-2007 महापालिका आयुक्त, सोलापूर

2) 2007 प्रकल्प अधिकारी, धारणी

3) 2008 उपजिल्हाधिकारी नांदेड

4) 2008 सीईओ, नागपूर जिल्हा परिषद

5) 2009 अति अदिवासी आयुक्त, नाशिक

6) 2010 के व्ही आय सी मुंबई

7) 2011 जिल्हाधिकारी जालना

8) 2011-12 जिल्हाधिकारी, सोलापूर

9) 2012 विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई

10) 2016 आयुक्त, नवी मुंबई महापालिका

11) 2017 पिंपरी-चिंचवड परिवहन, पुणे

12) 2018 नाशिक महापालिका आयुक्त

12) 2018 नियोजन विभाग, मंत्रालय

13) 2019 एड्स नियंत्रण प्रकल्प संचालक

14) 2020 नागपूर महापालिका आयुक्त