उर्जामंत्री राऊत अन् गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राजधानी मुंबई 12 ऑक्टोंबर रोजी अंधारात गेली होती. मुंबईतील वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यावेळी मी घातपात असल्याचे सुतोवाच केल होत. पण अनेकांनी मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तूस्थिती अशी आहे की तो घातपातच होता. यासंदर्भात सायबर विभागाकडून मला संध्याकाळी 6 वाजता अहवाल येईल. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर हा रिपोर्ट मला मिळणार असल्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितलं. मात्र राऊत यांच्या या विधानावरुन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे. हा घातपात नाही, अधिकाऱ्यांनी चूक केली, समन्वय ठेवला नाही. अपयश झाकण्यासाठी दोन्ही मंत्री जनतेला मूर्ख बनवत आहेत. असे अशोभनीय कृत्य करणाऱ्या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईचा वीजपुरवठा 12 ऑक्टोबर रोजी खंडीत झाला होता. या प्रकरणात उर्जामंत्री नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठ थोपटून घेण्याचा प्रकार केला. कपोलकल्पित अहवालाच्या आधारावर जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केला आहे. संबंधित लाईन सायबर अटॅकच्या पातळीचा भाग नाही. तसेच एका आंतरराष्ट्रीय पेपरच्या आधारावर आयपीएस ऑफिसरने अहवाल तयार केला. चीनचे नाव अहवालात होते तर केंद्रीय परराष्ट्र किंवा गृहमंत्रालयाला कळविले होते का, असा सवाल उपस्थित करत अधिवेशनाच्या तोंडावर अपयश लपविण्याचे कारस्थान असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.