भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ बघू नयेत : अशोक चव्हाण (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून टीका होत आहे. भाजप नेत्यांकडून हे तीन पक्षांचे सरकार फारकाळ टीकणार नसल्याची टीका केली जात आहे. महाविकास आघाडीमधील पक्षातील नेत्यांमध्ये एकमत नसल्याने हे सरकार कधीही पडू शकते असे विरोधीपक्ष असलेल्या भाजपकडून वारंवार बोलले जात आहे. यावर माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी वक्तव्य करताना भाजपवर निशाणा साधत टीका केली आहे.

अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधताना टीका केल आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणे भाजपने बंद करावे, अशी खोचक टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. आमच्यामध्ये उत्तम समन्वय असून भाजपने असे स्वप्न बघणे बंद करावे असा टोला अशोक चव्हाण यांनी भाजपला लगावला आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीत असलेल्या तीन पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. कोणत्याही वादाचे मुद्दे येणार नाहीत याची आम्ही दक्षता घेत आहोत. तरी देखील एखादा मतभेद असेल तर तो प्रश्न सोडवण्यासाठी समन्वय समिती गठन करण्यात आली आहे. एखादा गंभीर विषय समोर आल्यास हा प्रश्न सोडवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. हीच समिती हा गहन प्रश्न सोडवेल. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा होऊ शकते असे चव्हाण यांनी सांगितले.

You might also like