‘मराठा आरक्षणाबाबतची भाजपची दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा चव्हाटयावर’

मुंबई, ता. २७ : पोलीसनामा ऑनलाइन : सध्या राजकीय वातावरण मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. भाजपाची मराठा आरक्षणाबाबतची (Maratha reservation) भूमिका केवळ दिखावा आहे. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे, अशा शब्दांत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपावर टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर आणली असं अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

दरम्यान, त्यांनी आज मांडलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत. आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा दिखाऊ असून या मुद्द्यावर त्यांना केवळ राजकारणच करायचं आहे, हे स्पष्ट आहे, असे ट्विट करत अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबतची भाजपाची दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सचिन सावंत यांनीही भाजपावर हल्लाबोल केला आहे. “एके ठिकाणी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे असा देखावा करायचा व दुसरीकडे आपल्याच कार्यकर्त्यांना न्यायालयात विरोध करायला सांगायचे‌? भाजपानेच मराठा आरक्षणाविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवली का? अनुप मरार कोण आहे? संघ कनेक्शन काय? याचे स्पष्टीकरण भाजपा नेते चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे”, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

 

 

 

संघ विचारधारेप्रमाणेच भाजपाची मानसिकता आरक्षण विरोधी आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, असा दिखावा करायचा आणि प्रत्यक्षात मात्र आरक्षण मिळू नये म्हणून मोहिमा चालवायच्या ही भाजपाची कार्यपद्धती आहे. याचे कारण असे की, सर्वोच्च न्यायालयात आरक्षणविरोधी लढाई लढणारे सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन या संघटनेचे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कनेक्शन आहे. या संस्थेतील बहुसंख्य विश्वस्त हे आरएसएसशी संबंधित असून नागपूरचेच आहेत. त्याचबरोबर भाजपाच्या संघाच्या कार्यामध्येही ते अग्रेसर असतात याचेही पुरावे समोर आले आहेत. CAA कायद्याला पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी भाजपाच्या व्यासपीठावर होती, असे सचिन सावंत म्हणाले.

पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले, त्यापेक्षा गंभीर बाब ही की, या संस्थेचे संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे पूर्व विदर्भातील समन्वयक आहेत. त्यांनी स्वतःचा पत्ता या संस्थेचा पत्ता म्हणून नोंदवलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीच त्यांची समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात ही न्यायालयीन लढाई चालली होती. त्यावेळी ही संस्था अस्तित्वात नव्हती. परंतु मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर या संस्थेचे कामकाज सुरु झाले आणि ही संस्था प्रमुख्याने मराठा आरक्षण विरोधातच कार्यरत आहे असे कागदपत्रावरून दिसते. मराठा आरक्षण विरोधात चार याचिकाकर्ते या संस्थेने पाठवले असे या संस्थेच्या वेबसाईटवर नमूद आहे. डॉ. अनुप मरार हे मराठा आरक्षणाविरोधात त्यांच्या सहकाऱ्याबरोबर नागपूरमध्ये मोर्चे काढत होते तरीही भाजपा पदाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, असे सचिन सावंत यांनी सांगितले.

मग भाजपाने त्याला का थांबवले नाही?

सदर संस्थेमार्फत नामवंत वकील मराठा आरक्षणाचा विरोध करण्यासाठी देण्यात आले होते. तसेच डॉ अनुप मरार यांचे देवेंद्र फडणवीस याच्यासह अनेक भाजपा नेत्यांशी संबंध आहेत. हे सर्व पाहता भाजपाने मराठा आरक्षण विरोधात रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली का? याचे उत्तर दिले पाहिजे अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. कोल्हापूर येथे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेच्या कारवायांविरोधात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी घेतलेल्या आरक्षण विरोधी भूमिकेविरोधात मराठा समाजाच्या आंदोलकांनी मोठे आंदोलन केले यातून या संस्थेची भूमिका आणि मराठा समाजाचा या संस्थेविरोधातील रोष किती मोठा आहे हे स्पष्ट होते. कोणी वैयक्तिक पातळीवर कोणत्याही प्रश्नावर न्यायालयात जाऊ शकतो पण इथे भाजपाचा पदाधिकारी हा भाजपाच्या नीती नियमांशी बांधील असतो. मग भाजपाने त्याला का थांबवले नाही? यांचे उत्तर मिळाले पाहिजे असेही सचिन सावंत म्हणाले.

जनतेची दिशाभूल करून आपल्या पापांचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न

देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना पाच राज्यांच्या निवडणुकीत सत्तापिपासू वृत्तीने भाजपाने मोठमोठ्या सभा व रोड शो करून कोरोनाचा प्रसार केला. त्यामुळेच देशात कोरोनाचा हाहाकार उडाला. ५ जूनच्या आंदोलनानंतर जर महाराष्ट्रात कोरोनाचा भडका उडाला तर त्याला सुपर स्प्रेडर भाजपाचे वर्तनच जबाबदार असेल, असा इशारा सचिन सावंत यांनी दिला आहे. भाजपाचे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि तत्कालीन राज्यातील फडणवीस सरकार यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला अडथळा निर्माण झाला हे स्पष्ट असताना भाजपा जनतेची दिशाभूल करून आपल्या पापांचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न करत आहे. याकरिता ५ जून रोजी भाजपा पुरस्कृत आंदोलन केले जाणार आहे. भाजपाची ख्याती कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून अगोदरच प्रस्थापित झालेली आहे.