काय सांगताय ! लाच म्हणून मागितल्या चक्‍क बॉलिवूडच्या २ नायिका ; ‘या’ बडया नेत्याच्या ट्विटने खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे. या ट्विटची मोठी चर्चा सध्या सुरु आहे. लाच म्हणून बॉलीवूडच्या २ नायिका मागणाऱ्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याखाली करवाई करता येईल ? याबाबतचे संशोधन करीत आहेत. तसेच याबाबात काही माहिती असेल तर सुचवा, असे आवाहन स्वामींनी केले आहे.

Advt.

काय आहे सुब्रमण्यम स्वामींचे ट्विट ?
स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “मी सध्या लाचलुचपत प्रतिबंध कायद्याचा अभ्यास करत आहे. एखाद्या मंत्र्याने प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी बॉलिवूडच्या दोन नायिकांची मागणी केली होती. त्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याअन्वये कारवाई करता येईल ? याबाबत मी अभ्यास करत आहे. काही सूचना असतील तर कळवा. मी संशोधन करत असलेल्या सध्याच्या एका घोटाळ्याच्या प्रकरणात ते उपयोगी पडेल.”

मंत्र्याचे नाव गुलदस्त्यात
प्रकल्पाला मान्यता पाहिजे, तर दोन बॉलिवूड नायिका पुरवा, अशी या मंत्र्याची मागणी आहे. परंतु स्वामींनी या मंत्र्याचे नाव जाहीर केलेले नाही. सुब्रमण्यम स्वामींच्या या ट्वीटने मात्री राजकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे. बॉलिवूडमध्येही नवा गॉसिप बॉम्ब फुटला आहे. स्वामींच्या या ट्वीटमुळे काहींनी माजी मंत्र्याकडे बोट दाखवले आहे. तर काहींनी हा मंत्री सध्याचाच असल्याचे सांगितले.