पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आपल्या संपर्कात

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – ज्यांनी अनेक वर्षे तुमची सेवा केली. तुमची राजकीय परिस्थिती नसताना स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवून तुमचे काम केले. तुम्ही देव असल्याचे लोकांना सांगत होता त्यांनाही तुम्हाला सांभाळता आले नाही असे सांगत तुमच्या ताफ्यात असणारे लोकही आपल्या संपर्कात असल्याचे विठ्ठल रखुमाई देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.

वेणूताई चव्हाण स्मारक येथे विकासाचे अतुलपर्व या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेखर चरेगावकर, कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, विद्या पावसकर, अशोकराव थोरात, रामकृष्ण वेताळ हे उपस्थित होते. यावेळी भोसले यांनी कराडमधील काँग्रेसची असलेली परस्थितीबाबत बोलताना ही माहिती दिली.

पुढे बोलताना अतुल भोसले म्हणाले, चव्हाण यांच्या ताफ्यातील कार्य़कर्ते माझ्याकडे येतात. यावेळी मी त्यांना एक सल्ला देतो आपण आलात तर लोक काय म्हणतील ? काहींना आपण दिल्या घरी सुखी रहा असा सल्ला देतो. आमच्याकडे सत्ता नसली, तरी आम्ही कार्य़कर्ता उघडा पडू देत नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.

 

You might also like