दुसऱ्या पत्नीच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली तरी आता पुन्हा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी बुधवारी (दि. 3) मुंबई पोलीस आयुक्तांकड़े मुंडेविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीत गेल्या 3 महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला. दरम्यान माझी निव्वळ बदनामी करण्याच्या हेतुने केलेल्या अशा आरोपात काही तथ्य नसल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

करुणा शर्मा यांच्या आरोपानंतर काही मराठी वृत्ताहिनीच्या वृत्तानूसार मुंडे यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. मुंडे या आरोपाबाबत म्हणाले की, करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी पुर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असून याचिकेत न्यायालयाने करुणा यांना मनाई आदेशही दिला आहे. त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्य न्यायालयाने, निवृत्त मुख्य न्यायाधीश ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केल्याची माहिती मुंडे यांनी दिली. सदर मेडिएशनच्या दोन बैठक झाल्या असून येत्या 13 फेब्रुवारी ला पुढील बैठक आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादांसह इतर सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ आहे. असे असतानाही आणि सहमतीने उच्य न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अश्याप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे, केवळ बदनामी करण्याचाच हा हेतू असून या आरोपात काही तथ्य नसल्याचे मुंडे यांनी सांगितलं.

… तर आमरण उपोषण करणार : करुणा शर्मा
करुणा मुंडे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या अर्जात माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपून ठेवले आहेत. 24 जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी मी बंगल्यावर जाताच, मुंडेनी पोलिसांना बोलावून मला हकलून लावले. मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही तर 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असून त्यासाठी चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आझाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी दयावी आणि मुंडे यांच्यावर कठोर करावाई करवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.