…अन् धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच घेतले फैलावर, कार्यपध्दतीमुळं नागरिकांमध्ये समाधान

बीड : पोलीसनामा ऑनलाईन –  72 प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी (दि. 26) बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपस्थितांना मुंडे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर मुंडे हे बीडच्या विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी मुंडे यांच्यासमोर नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. नागरिकांच्या तक्रारी ऐकून मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारत फैलावर घेतलं. तसेच कामात हयगय नको, अशी तंबीही त्यांनी अधिका-यांना दिली. मुंडेंच्या या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

ध्वजारोहण झाल्यानंतर मुंडे यांच्या हस्ते यावेळी स्मार्ट ग्राम पंचायत पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायती, विशेष सेवा पुरस्कार प्राप्त पोलीस, तसेच राज्यस्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले…

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर म्हणाले की, रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली, त्याविषयी फारशी माहिती नाही. मात्र या संबंधात कागदपत्रे जेंव्हा आमच्या हाती आली, तेंव्हा खोलात जाण्याची गरज असल्याचा निष्कर्ष आम्ही काढला होता. त्यामुळे तो बरोबर होता, असे म्हणावे लागेल असे पवार म्हणाले.