मंत्री धनंजय मुंडेंना प्रसार माध्यमांच्या कॅमेर्‍यांनी घेरलं, बलात्काराच्या आरोपावर म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वातावरण पेटल आहे. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून मुंडे प्रसार माध्यमांना चकवा देत होते. मात्र अखेर बुधवारी (दि. 14) दुपारी त्यांना माध्यमांनी त्यांना घेरलं. शासकीय बंगल्यातून बाहेर पडत ते राष्ट्रवादी कार्यालयात जनता दरबारासाठी जात होते, तेव्हा पत्रकारांनी मुंडे यांना बलात्काराच्या आरोपावर प्रश्न विचारले त्यावर नो, कमेंट्स. मी जनता दरबारासाठी जात आहे असे सांगत त्यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले.

बुधवारी भल्या पहाटे धनंजय मुंडे हे खासगी कारमधून शासकीय बंगल्यात दाखल झाले. या गाडीच्या काचा पूर्णपणे काळ्या होत्या. यात आतमध्ये कोण बसलंय हेदेखील दिसत नव्हते, त्याचसोबत धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेले सुरक्षा ताफाही नव्हता. मीडियाला चकवा देत मुंडे बंगल्यावर दाखल झाले होते. दरम्यान मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले होते.

2003 मध्ये एका महिलेसोबत माझे परस्पर संबंध होते, त्यातून आम्हाला 2 मुल झाली आहेत. या मुलांना मी माझ नाव दिले आहे. त्याचसोबत त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारीही माझी आहे. मात्र 2019 पासून या महिलेच्या बहिणीने मला धमकावणे आणि माझ्याकडून पैसे मागणे यासाठी दबाव टाकत आहे. सध्या हे संपूर्ण प्रकरण कोर्टात असून याबाबत जास्त बोलण योग्य राहणार नाही. मात्र कोर्टात आपल्या सोयीनुसार सेटलमेंट करावी यासाठी हा दबावतंत्राचा भाग असू शकतो असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

मुंडे प्रकरणात शरद पवारांचे कारवाईचे संकेत
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप गंभीर आहेत, त्यांनी माझी भेट घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. हे प्रकरण कोर्टातही सुरू आहे. मुंडे यांनी दिलेली माहिती पक्षाच्या बैठकीत सर्व सहकाऱ्यांना सांगितली जाईल. त्यानंतर पक्ष म्हणून जो निर्णय घ्यायचा आहे तो मी घेईन, कोणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे असे सांगत मुंडे प्रकरणात कारवाई करण्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.