मोदींच्या सभेला गाडीवर 5-5 जण ‘बिनधास्त’ बसा, बाकी मी बघतो : मंत्री फुके (व्हिडिओ)

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभेच्या प्रचार सभांच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. येत्या 13 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा भंडाऱ्यात होणार आहे. या दरम्यान कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागा अशा सूचना स्थानिक पातळीवर नेत्याकडून देण्यात आल्या आहेत. परंतू हे करताना केंद्र सरकारनेच लागू केलेले वाहतूकीचेे नियम धाब्यावर बसवल्याचा घाट घातला जात आहे. पंतप्रधान मोदींच्या सभेला एका गाडीवर 5-5 जण बसून या, पण नक्की या. तुम्हाला कोण आडवतं बघू, अशी धमकी गोंदियाचे पालकमंत्री परिणय फुके यांनी दिली.

दुचाकीवरुन 5-5 जण बसून या
परिणय फुके हे साकोली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. फुकेे यांच्या भाषणा दरम्यान त्यांचे भाषेवरील तारतम्य सुटले आणि पंतप्रधान मोदींच्या सभेला एका दुचाकीवरुन 5-5 जण बसून या, पण या असे आवाहन त्यांनी भर सभेत कार्यकर्त्यांना केले. गाडी पकडल्यास पोलिसांना सांगा मी परिणय फुकेंचा कार्यकर्ता आहे, तुम्हाला कोणीही हात लावणार नाही.

परिणय फुके यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले हे खरे असले तरी वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवण्याची परवानगीच दिली आहे असे या व्हिडिओतून दिसते. एवढेच नाही तर आचारसंहिता सुरु असताना पोलिसांना एक प्रकारे दम दिल्याचे या प्रकारावरुन दिसते. हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे.

एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना वाहतूक नियमांचे उल्लघंन करण्याचा परवाना देत आहे.

Visit : Policenama.com