नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंना ‘कोरोना’ची लागणं ! राज्यातील 5 मंत्री कोरोना Positive

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –    राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात आता नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. गेल्या 5 दिवसात ऊर्जा मंत्री नितीन राऊत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत त्यांना कोरोना झाल्याचं सांगितलं आहे. त्यांनी लिहिलं की, “काल मी माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटीव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रकृती ठिक आहे.”

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणतात, “गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वत:ची कोविड चाचणी करून आवश्यकत ती खबरदारी घ्यावी ही विनंती.” असंही ते म्हणाले आहेत.

राज्यात यापूर्वी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, विश्वजित कदम, शंकरराव गडाख यांच्यासह अन्य काहींना कोरोनाची लागण झाली होती.