सत्तेत कोणीही चिरकाल नाही, गिरीश बापट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 
देशात आता सत्याच्या प्रयोगाऐवजी सत्तेचे प्रयोग सुरु आहेत, असं वक्तव्य भाजप नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री,पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी केलं. ते मुंबईत एफडीएच्या कार्यक्रमात बोलत होते. उद्या सत्तेत कोणी ना कोणी येईल. इथे कुणीही चिरकाल राहिलेलं नाही, असंही गिरीश बापट म्हणाले.  याआधीही पुन्हा सत्ता येईल न येईल आत्ताच कामं करुन घ्या, असं वक्तव्य बापट यांनी एका जाहिर सभेत केलं होतं.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’54a86680-cde4-11e8-b43f-d33dc38f4978′]

गिरीश बापट म्हणाले, “सत्याचे प्रयोगऐवजी सत्तेचे प्रयोग सुरु आहेत. सत्तेचे प्रयोग जरा बाजूला ठेऊ. उद्या कोणी ना कोणी सत्तेत येईल. इथे काही कुणी चिरकाल आलेला नाही. खरे सत्याचे प्रयोग केले पाहिजे जनमानसात गेलं पाहिजे ”.

भेसळ करणाऱ्यांवर कारवाई –

यावेळी गिरीश बापट यांनी भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. आता भेसळ करणाऱ्यांवर आणि गुटखा विकणाऱ्यांवर कडक कारवाई करु असं ते म्हणाले. कायद्यात सुधारणा करुन भेसळ आणि गुटखा विक्रीच्या गुन्ह्यांसाठी थेट जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करणार आहे. सध्याच्या कायद्यानुसार असणारी शिक्षा तोकडी आणि बरेच ठिकाणी जामिनपात्र आहे. येत्या कॅबिनेटमध्ये नवी दुरुस्ती मंजूर करुन घेऊ, असं बापट यांनी नमूद केलं.
महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमीत्त संपूर्ण भारतात अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांनी ”इट राईट इंडिया” ही चळवळ सुरु केली आहे.  यासाठी देशभरात स्वास्थ भारत यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. 16 ऑक्टोबरपासून ही स्वास्थ भारत यात्रा सहा सायकल ट्रॅकवरुन निघणार आहे. या स्वास्थ भारत यात्रेचं विमोचन झालं, त्याबाबत बापट यांनी माहिती दिली.

[amazon_link asins=’B01LZKSUXF,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8059b47b-cde4-11e8-993e-ff55f0e69e46′]

#MeToo

देशभरात मी टू ही चळवळ सुरु झाली आहे, त्यामुळे अनेकांना न्याय मिळेल. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा. मात्र, याचा गैरवापरही होऊ शकतो हे ही लक्षात ठेवायला हवे, असंही गिरीश बापट यांनी नमूद केलं.

…अन् त्याच्या भीतीपोटी तरुणीची आत्महत्या