युती बाबात कोणताही ‘फॉर्म्युला’ ठरला नाही : गिरीश महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा-शिवसेना युतीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीतच ठरला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावर बोलताना गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, अद्याप युतीचा फॉर्म्युला ठरलाच नसल्याचे सांगत, समान जागावाटपचा विषयच येत नसल्याचे सांगितले. दोन्ही पक्ष श्रेष्ठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवतील, त्यामुळे उगाच कुणी त्यात मत मांडू नये असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाची जागा निश्चित करण्यासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सत्ता व जागावाटपात समान वाटप असा युतीचा फॉर्म्युला ठरला असल्याचा दावा केला होता. मात्र, युतीत असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचा खुलासा गिरीश महाजन यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीतच ठरला असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. सत्तेत आणि जागावाटपात समान वाटप असा फॉर्म्युला भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर असताना ठरला असल्याचे राऊत म्हणाले होते. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीबाबत युतीचा कोणताही फॉर्म्युला अजून ठरला नाही. पण दोन्ही पक्ष युतीसाठी सकारात्मक असल्याचे महाजन यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like