धार्मिक स्थळं सुरू करण्यासाठी आंदोलन, ‘लोकांनी थोडा संयम बाळगावा’ : हसन मुश्रीफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यातील धार्मिक स्थळं सुरू करावीत यासाठी आंदोलनं केली जात आहे. यावर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवस लोकांनी थोडा संयम बाळगावा असं ते म्हणाले आहेत.

‘कोरोना संकट वाढत असल्यानं धार्मिक स्थळं बंद’

हसन मुश्रीफ म्हणाले, “राज्यातील धार्मिक स्थळं (मंदिर, मशिद) सुरू करावेत यासाठी आंदोलन केलं जात आहे. पंरतु कोरोना संकट वाढत आहे. आता ई पासही काढला आहे. लोक प्रवास करतील. मात्र अजूनही कोरोनाची भीती आहे. काही दिवस लोकांनी थोडा संयम बाळगावा.” असं त्यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री, सह्याद्री येथून चांगलं काम करत आहेत. राज्यातील समस्या सोडवत आहेत. विरोधात विनाकारण त्यांना बदनाम करत आहेत.”

मुश्रीफ म्हणाले, “ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या मालमत्तेवर कर्ज मिळेल. त्यामुळं ग्रामीण लोकांना दिलासा मिळेल. कोरोना संकटात आर्थिक व्यवहार करायचे असतील तर कर्ज घेता येईल असा महत्त्वाचा निर्णय ग्रामविकास विभागानं घेतला आहे.”