मंत्री हसन मुश्रीफ यांच्या थोरल्या बहीण हिबजाबी मुजावर यांचे 78 व्या वर्षी कोरोनाने निधन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची थोरल्या बहीण श्रीमती हिबजाबी बाबासाहेब मुजावर यांचे ७८ व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शनिवारी श्रीमती हिबजाबी बाबासाहेब मुजावर यांनी अखेरचा श्वास घेतला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या थोरल्या बहिणीच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

दुसरी लाट ही भयंकर असून कृपया कुणीही सांत्वनासाठी येऊ नये. कडक लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गाची भीती आहे. अत्यावश्यक काम असल्यास फोनवरून बोलावे व लॉकडाऊन उठल्यानंतर भेटूया. घरी रहा, सुरक्षित रहा. कोरोनाची लक्षणे आढळल्यास विनाविलंब तपासणी करुन घ्यावी आणि पुढील उपचारासाठी माझी मदत घ्यावी, अशी विनंती मंत्री मुश्रीफ यांनी केली आहे. तसेच, यंदाच्या कोरोना संकटात ज्येष्ठ बहिण, लहान बहिणीचे पति (मेव्हणे), भाचीचा पती, मामाचा मुलगा यांना गमावल्याबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृत हिबजाबी मुजावर यांच्या पश्चात नातू, सून, ३ मुली असा परिवार आहे.