मराठा आरक्षण देण्यासाठी शाहू महाराजानंतर एका ब्राम्हणाला जन्म घ्यावा लागला : महादेव जानकरांचं ‘वादग्रस्त’ वक्‍तव्य

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शाहू महराजांना पहिल्यांना मराठ्यांना आरक्षण दिले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा छत्रपतींच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एका ब्राम्हाणाला जन्म घ्यावा लागला, असे वादग्रस्त विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. जानकर यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे विधानसभेच्या तोंडावर राजकीय वातावरण पुन्हा तापण्यास सुरुवात झाली आहे.
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणात मी फक्त माझे कर्तव्य पार पाडले असल्याचे सावध वक्तव्य केले होते. आता माहादेव जानकर यांनी कलेल्या वादग्रस्त वक्यव्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

माढा तालुक्यातील अरण येथे झालेल्या सावता परिषदेत महादेव जानकर बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. मराठा समाजामध्ये फक्त दोन टक्के लोक श्रीमंत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे होते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठ्यांना दिलेले आरक्षण ओबीसी समाजाच्या कोट्याला फटका बसणार आहे, असा चुकीचा प्रचार काही मंडळी करत असल्याचे जानकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समजाला आरक्षण दिले आहे. असे सांताना त्यांनी जगातील सगळ्यात महाग वकीलाची नेमणूक कली. हा वकील तसाला दोन कोटी रुपये फी घेत होता अशी माहिती जानकरांनी यावेळी दिली. बोलण्याच्या ओघात जानकारांना नको ती माहिती सार्वजनीक ठिकाणी बाहेर आणल्याने मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –