Minister Nawab Malik | ‘केंद्राकडून राज्याला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारच्या लसीकरण (Vaccination) पुरवठ्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘जेवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे, तेवढा पुरवठा केंद्र सरकारकडून (Central Government) महाराष्ट्राला होत नसल्याने लसीकरणाची (Vaccination Centers) केंद्र बंद करावी लागत आहेत, असं मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी म्हटलं आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, ‘लसीचा दुसरा डोस घेणार्‍या नागरिकांची संख्या वीस लाख असून पहिला डोस घेणार्‍या लोकांची संख्या मोठी आहे. दुसऱ्या डोसची लस मिळेल पण पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पहावी लागत आहे. त्यामुळेच लसीकरण केंद्रे (Vaccination Centers) बंद पडत असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

पुढे नवाब मलिक म्हणाले की, ‘खासगी रुग्णालयात (Private hospital) लसीचा साठा आहे. तो
संपत नाही. खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनाला त्या लसीची मुदत संपेल ही भीती वाटते आहे म्हणून
त्यांनी तो साठा सरकारला तात्काळ द्यावा जेणेकरून निर्माण झालेली लसटंचाई कमी होईल. असं ते
म्हणाले. तर, जेव्हा त्यांना आवश्यक आहे त्यावेळी टप्प्याटप्याने ती लस परत करण्यात येईल, असा
निर्णय मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत देखील झाल्याचे मलिक यांनी म्हटले. तसेच,
महाराष्ट्रात निर्माण झालेली लसटंचाई लक्षात घेता केंद्राने तात्काळ लसीचा पुरवठा करावा अशी
मागणी देखील मलिक (Minister Nawab Malik) यांनी केंद्र सरकारकडे (Central Government) केली असल्याचे सांगितले.

हे देखील वाचा

Corona in Pune | लसीकरणानंतरही पुणे जिल्ह्यात आढळले 7 हजार 636 ‘कोरोना’बाधित

Pune Police | सराईत गुंडावर MPDA कायद्याखाली कारवाई, गुंड योगेश गायकवाडची येरवड्यात रवानगी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Minister Nawab Malik | covid 19 vaccination centers have be closed due non supply vaccines state center allegation nawab

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update