मंत्री नवाब मलिकांचा ‘कडक’ इशारा, म्हणाले – ‘भाजप आमदार भातखळकर अन् प्रसाद लाड यांचं पितळ उघडं पाडणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील दोन तीन दिवसापासून रेमडीसीवीर इंजेक्शन तुटवड्याच्या मुद्यावरून राज्यात राजकारण चांगलच तापलं आहे. यानंतर फार्म कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोघे रात्री त्या मालकाला सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचले. या कारणावरून भाजपचे प्रसाद लाड आणि अतुल भातखळकर यांनी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याला प्रत्युत्तर देत मालिकांनी या दोन आमदारांना खडेबोल सुनावले आहे. तेव्हा ते प्रसार माध्यमाशी बोलत आहोत.

काय म्हणाले नवाब मलिक?
आगामी काळात भाजपाच्या कारनाम्यांचा भांडाफोड करणार असल्याचं म्हणत, त्यांनी भाजपच्या माजी आमदाराने रेमडेसिवीरचा केलेला काळाबाजार याची माहिती माध्यमांसमोर पुराव्यानिशी मांडली. याचवेळी काही कागदपत्रे आणि व्हिडिओ माध्यमांना दिले.या देशात कोरोनाचे आकडे वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर मात्र रेमडेसिवीर मिळत नाही असे चित्र निर्माण झाले. त्याचकाळात भाजपाच्या सुरत येथील कार्यालयात मोफत रेमडेसिवीर इंजेक्शन वाटप करण्यात येत असल्याच्या प्रकरणावर आम्ही बोट ठेवले. परंतु, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी रेमडेसिवीर वाटप करण्यास किंवा साठा करण्यास परवानगी दिली नसल्याच स्पष्ट केलं होत. त्यादिवसापासून भाजपाचे काही नेते पन्नास हजार रेमडेसिवीर इंजेक्शन आणून देऊ असा दावा करत होते असे नवाब मलिक म्हणाले.

माझा राजीनामा मागताय, पोलीस ठाण्यात तक्रार देताय, महामहिम राज्यपालांकडे जाताय..या देशात मोदी नावाचा कायदा आलाय का? त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्यपाल महोदयांकडे देण्यात आले आहेत का? मोदी कायदा आला असेल आणि अंमलबजावणीचे अधिकार हे राज्यपाल यांच्याकडे असेल तर त्याची माहिती द्यावी अशी मागणी करतानाच मला बोलण्याचा अधिकार आहे आणि मी बोलणारच तसेच, क्रिस्टल कंपनीच्या मालकाला सांगू इच्छितो की, तुमचा कारभार किती क्रिस्टल आहे याचा भांडाफोड आज ना उद्या करणारच, भतीजाचा भाग किती कुणी खाल्ला हेही समोर आणणार आहे. कांदिवली – मालाडचे जे आमदार आहेत ते कुठे रात्री बसतात, दुपारी कुठे बसतात. त्यांच्याजवळचे लोक ED मार्फत तुरुंगात आहेत. त्यांच्याकडून काय काय घेतलंय. किती देवाणघेवाण झाली याची माहितीही येणाऱ्या काळात सांगू असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, संपूर्ण देशात, राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झालेला आहे. ही सत्य परिस्थिती असताना भाजपच्या काही लोकांना राजकारणाशिवाय काही करता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. मागील ५ दिवसात भाजपाने सरकार कामच करत नाही, रेमडेसिवीर उपलब्ध करुन देत नसल्याचा प्रचार केला आहे परंतु सत्यपरिस्थिती वेगळी असल्याचेही मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. आणि आमदार अतुल भातखळकर आणि आमदार प्रसाद लाड यांना यामधून एक इशारा दिला आहे.