सर्व आत्मघाती हल्‍लेखोरांचा कुठं न कुठं ‘मदरशा’सोबत संबंध : PAK मंत्री हुसेन

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – चांद्रयानाविषयी नेहमी वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला आहे. सर्व आत्मघाती बॉम्बर हे मदरशांचे विद्यार्थी आहेत असे त्यांनी विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर लोकांच्या ते निशाण्यावर आले आहेत.

एका ट्विटला उत्तर देताना चौधरी फवाद हुसेन म्हणाले की, ‘मदरशांमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी आत्मघाती बॉम्बर नाहीत. मात्र कटू सत्य हे आहे की सर्व आत्मघाती बॉम्बर हे मदरशांचे विद्यार्थी आहेत. ‘

अनेक वेळा आपल्याच देशातील युजर्सकडून फवाद ट्रोल –
फवाद हुसैन यांनी 2013 मध्ये एका ट्विटमध्ये म्हटले होते की , ‘पाकिस्तान जगातील सर्वोत्तम आत्मघाती बॉम्बर बनवते. याबद्दल कोणतीही शंका नाही.’ त्यावेळीसुद्धा सोशल मीडियावरील पाकिस्तानी युजर्सनी फवाद हुसेन यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी ते इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ (PTI) या विरोधी पक्षाचे नेते होते.

वादग्रस्त विधाने करून वाद ओढवून घेण्याची चौधरी फवाद हुसेन यांची जुनी सवय आहे. फवाद हुसेन यांनी यापूर्वी भारताच्या चांद्रयान -2 मोहिमेची खिल्ली उडविली उडवताना म्हटले होते की खेळणे (विक्रम) चंद्राऐवजी मुंबईत उतरले असावे. जे काम जमत नाही ते करत जाऊ नका… डियर “एंडिया”. त्यांच्या या फालतू विधानांची खुद्द पाकिस्तानमधील जनतेने आणि मीडियाने निंदा केली होती.

 

You might also like