भारत ‘या’ वर्षात चंद्रावर करणार ‘चंद्रायान – 3’ ची ‘लॅंडिंग’, ‘PMO’ च्या मंत्र्यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2019 मध्ये भारताचे चंद्रायान – 2 चे प्रक्षेपण झाले होते. विक्रम लॅंडरला चंद्रावर उतरण्यात भारताचा प्रयत्न अपयशी ठरला. या लँडिंगवेळी इसरोच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. त्यांनी वैज्ञानिकांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रयत्न ही केला.

आता भारत पुन्हा एकदा चंद्रावर यान पाठवण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की चंद्रायान – 3 नव्या वर्षाच्या 2020 मध्ये चंद्रावर पाठवण्यात येईल. पंतप्रधान कार्यलयाच्या राज्यमंत्र्यांनी सांगितले की 2020 मध्ये चंद्रायान – 3 ची लँडिंग करण्यात येईल. कोणत्याही देशाने एका प्रयत्नात चंद्रावर लॅंडिंग केलेली नाही, आपण देखील प्रयत्न करत आहोत.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की चंद्रायान – 3 अत्यंत इकोनॉमिकल असेल. मंगळ मिशनने अत्यंत फायदा होईल. त्यांनी गगन यानाची चर्चा करताना सांगितले की हे यान 2022 च्या आसपास हे यान पाठवण्यात येईल. इसरोच्या योगदानाबद्दल बोलताना जितेंद्र सिहं म्हणाले की इसरो आज गृह मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाला सॅटेलाइटच्या माध्यमातून फायदा करुन देतील.

गोरखपूर आणि हरियाणामध्ये एटॉमिक यूनिट –
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की काकरापार – 3 गुजरात 2020 पासून सुरु होईल. गोरखपूर-हरियाणामध्ये आम्ही अटॉमिक पावर यूनिट सुरु करत आहोत, जे दिल्लीच्या जवळ असेल. त्यांनी नॉर्थ ईस्ट, जम्मू काश्मीर आणि लद्दाखमधील परिस्थितीवर बोलताना सांगितले की या क्षेत्रावर आमचे लक्ष असेल.
डीओपीटीचे सचिव सी चंद्रमौली म्हणाले की जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात आम्ही नोव्हेंबर महिन्यात गुड गवर्नेंस म्हणून दोन दिवसीय शिबीर ठेवले होते. नॉर्थ ईस्टमध्ये देखील रिजनल कॉन्फ्रेंस आयोजित केले होते.

सांगितल्या या वर्षाच्या काय काय कमावलं –
डीओपीटीचे सचिवांनी या वर्षातील उपलब्धता सांगितली की या वर्षी लोकपाल नियुक्त केले गेले. आरटीआय अमेंडमेंड बील पारित केले गेले होते. त्यांनी दावा केला की पब्लिक ग्रीवेंससाठी पोर्टलमध्ये सुधारणा केली आहे. मालदीव, बांग्लादेश बरोबर आफ्रिकन देशाच्या सिविल सर्वेंटला प्रशिक्षण देण्यात आले. असिस्टेंट सेक्रेटरीच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये अत्यंत उत्तम आहे. चंद्रमौली यांनी सांगितले की मंगोलिया आणि मालदीवबरोबर एमओयूवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

त्यांनी सांगितले की पेंशन संबंधित आम्ही अनेक बाबीवर कामे केली. यासंबंधित काही रिव्हू केले. आम्ही पेंशनरसाठी देखील ई प्रमाण आणले. डीओपीटीच्या सचिवांनी सांगितले की सिविल सेवेचे अधिकाऱ्याचे प्रशिक्षणासाठी आम्ही काम केले आहे. सिविल सर्वेंटच्या इंटरनॅशनल ऑनलाइन प्रशिक्षणासाठी आम्ही मोठे काम केला आहे.

दरवर्षी बनवणार एक न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर –
परमाणू ऊर्जा मंत्री ओएसडी श्रीकृष्ण गुप्ता यांनी सांगितले की न्यूक्लिअर KGS 1 प्रोजेक्टला आम्ही 95 दिवसात पूर्ण केले. त्यांनी सांगितले की हा प्रयत्न केला जाईल की नव्या वर्षापासून दरवर्षी एक न्यूक्लिअर रिअ‍ॅक्ट तयार करण्यात येईल. गुप्ता म्हणाले की कॅंसर आणि टीबीच्या डिटेक्शनसाठी आम्ही काम करत आहोत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/