केजरीवाल यांनी केला तिरंग्याचा अपमान, पांढर्‍या रंगाच्या ऐवजी हिरवा भाग वाढवला; केंद्रीय मंत्र्याचा आरोप

नवी दिल्ली – वृत्त संस्था  – कोरोना संकट काळात पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारमध्ये वाद होताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आरोप केला आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी तिरंग्याचा अपमान केला आहे. या विषयावरून केंद्रीय मंत्र्याने दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे.

केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांचे म्हणणे आहे की, काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत दिसत होते की, त्यांच्या पाठीमगे लावलेल्या 2 झेंड्यांमध्ये सफेद रंगावर हिरव्या पट्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यांनी म्हटले की, मी यासाठी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे, मी उपराज्यपालांना सुद्धा पत्राची कॉपी पाठवली आहे.

आपल्या पत्रात केंद्रीय मंत्र्याने लिहिले आहे की, अरविंद केजरीवाल यांनी असे करून गृह मंत्रालयाद्वारे जारी निर्देशांचे उल्लंघन केले आहे. प्रल्हाद सिंह पटेल यांनी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आता यामध्ये सुधारणा करावी. सोबतच त्यांनी अनिल बैजल यांना पत्र लिहून याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

READ ALSO THIS :

पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकासह 5 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल; प्रचंड खळबळ

तुळशीसह ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, फुफ्फुसे एकदम मजबुत अन् निरोगी बनतील, जाणून घ्या

 

नव्या नियमानुसार आता व्हॉट्सअप आणि फोन कॉलवर नजर ठेवणार सरकार? जाणून घ्या सत्य

रक्ताची कमतरता असल्यास आहारात ‘या’ 12 सुपर फूड्सचा समावेश करा, जाणून घ्या

 

Pune : दुर्दैवी ! विष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या, बारामती तालुक्यातील घटना

Immunity Booster Kadha : संसर्गापासून मुक्त होण्यास ‘या’ औषधी वनस्पतींचा काढा मोठी मदत करेल; इतर देखील अनेक फायदे, जाणून घ्या