मोदी सरकार – 2 चा 75 दिवसांचा ‘लेखा-जोखा’ ! पहिल्याच सत्रात ‘रेकॉर्ड’, पास केले 38 विधेयक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील 75 दिवसांच्या कामकाजाचा हिशेब सादर करणारे ‘जन कनेक्ट’ पुस्तक बुधवारी प्रसिद्ध झाले. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर हे पुस्तक प्रसिद्ध करताना म्हणाले की, मोदी सरकारच्या या संकल्पनेमुळे स्पीड ब्रेकर समजल्या जाणाऱ्या राज्यसभेचा हायवे करण्यात आला आहे. ते म्हणाले की, संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात सरकारने विक्रमी 38 विधेयके मंजूर केली. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढून टाकले, जेणेकरून तेथील लोकांना शिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्याशी निगडित योजनांचा फायदा होईल.

याशिवाय मोटार वाहन, तिहेरी तलाक अशी महत्त्वपूर्ण बिलेही मंजूर झाली आहेत. ते म्हणाले की या पुस्तकात स्पष्ट हेतू आणि निर्णायक कृती ठामपूर्वक परिलक्षित केले गेले आहे. सरकारने जनतेचे प्रश्न सोडवण्याचा ऐतिहासिकदृष्ट्या प्रयत्न केला आहे.

मोदी सरकारने घेतलेले मोठे निर्णय
पाॅक्सो कायद्यात समांतर अशी सुधारणा केली, ट्रान्सजेंडर हक्क संरक्षण विधेयक 2019 पास केले, गरिबांना आर्थिक फसवणूकीपासून वाचवण्यासाठी अनियमित ठेव योजना प्रतिबंध विधेयक 2019 ला मंजुरी दिली. याशिवाय शेतकऱ्यांना पेन्शन, खरीप पिकाचे किमान दर, शेतकरी विमा योजना, साखरेच्या बफर स्टॉकमध्ये वाढ असे अनेक धडाकेबाज निर्णय मोदी सरकारने घेतले. तसेच 58 अनावश्यक कायदे हटवण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त –