पवारांना मीच सोडलंय मग बाकीचे तरी कसे राहतील : रामदास आठवले

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपत प्रवेश करत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राज कारणात खळबळ उडाली असून अनेक नेते यासंदर्भात दावे प्रतिदावे आणि वक्तव्ये करत आहेत. असे असताना आता आरपीआय चे नेते आणि केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनींही एक वक्तव्य करत या वादात उडी घेतली आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत चांगले नेते आहेत. त्यांनी समाजातील अनेक चांगली काम केली आहेत. मात्र भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेत आहे असा आरोप करण्यापेक्षा पक्षातील नेते सांभाळावेत असा सल्ला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिला असून “मीच त्यांना सोडले आहे, मग बाकीचे तरी कसे राहतील, ” असा प्रश्नात्मक टोलाही त्यांनी पवारांना मारला.

सत्ता आणि आमदारकी राखण्यासाठी नेत्यांचे पक्षांतर :
पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांना आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून येणे कठिण वाटत असल्याने पक्ष बदलला तर सत्ता आणि आमदारकी राहू शकते याची जाणीव असल्याने ते अन्य पक्षांमध्ये जात आहेत. कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची ही भावना चुकीची नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून सगळ्यांनी आपापला प्रचार करावा, उगीचच एकमेकांवर खोटेनाटे आरोप करू नयेत. त्यापेक्षा आपापल्या पक्षासाठी मत मागावीत असाही सल्ला देण्यास ते विसरले नाहीत. तसेच यावेळी त्यांनी रिपाइंला १० दिल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला ५० ही जागा मिळणार नसल्याचा दावाही आठवलेंनी केला.

आरोग्यविषयक वृत्त