Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ramdas athavle | केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले (Union Ministe Ramdas Athavale) हे पुणे दौऱ्यावर असून त्यांनी विविध घडामोडीं संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शरद पवार  ( Sharad Pawar) हे देशाचे नेते आहेत ते धोकेबाज नाहीत. पवार हे राष्ट्रपतिपदाचे (NCP) उमेदवार असतील तर आमच्या शुभेच्छा असतील. मात्र, ते निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच बळीचा बकरा करू नये, असे त्यांनी सांगितले.

आठवले म्हणाले, जातनिहाय जनगणना झाल्याने जातीयवाद वाढेल या मताचा मी नाही. जातनिहाय जनगणना झाली तर कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व द्यायचे हे नेमकेपणाने ठरविता येईल. ओबीसी समाजाची (OBC Society) जनगणना (Census) आवश्यक आहे. यापूर्वी जो ओबीसींचा डाटा तयार केला आहे तो अंजानुसार आहे. त्यामुळे केंद्र सरकार ( Central Government) तो डाटा देत नसल्याचे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे सरकारमध्ये ( Uddhav Thackeray Government) शरद पवार यांच्यामुळे ताळमेळ नाही. शिवसेनेला जर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्वप्न साकार करायचे असल्यास त्यांनी भाजपसोबत यावे. आमदार फुटतील या भीतीने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगत राज्याला मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) अधिकार देण्यासाठी संसदेने ठराव मंजूर करावा,
अशी मागणी आम्ही केली आहे असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

Web Title : Ramdas athavle |  minister ramdas athavle speaks ncp leader sharad pawar president obc senses needed

हे देखील वाचा

 

Mumbai : DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’

Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !

El-Colacho Festival | ‘इथं’ भररस्त्यात मुलांना झोपवून वरून उडी मारतो व्यक्ती,
धर्माच्या नावावर भयंकर परंपरा सुरू

Pune Crime | पुणे -पंढरपुर पालखी मार्गावर कुख्यात गुंड गणेश रासकरची
‘गेम’, डोक्यात गोळीबार करून केला ‘खात्मा’