यवतमाळ : वनमंत्री संजय राठोड यांना बदनाम केलं जातंय, शिवसेनेकडून भाजपाचा निषेध

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण समोर करून वनमंत्री संजय राठोड यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी मंगळवारी (दि. 16) नेर (जि. यवतमाळ) येथे भाजपचा निषेध नोंदविला. शहरातून काढलेल्या या मोर्चात महिला- पुरुषांचा मोठा सहभाग होता. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी विविध प्रकारच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. तहसील कार्यालयावर धडकलेल्या मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. दिग्रस येथेही शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता. यात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यात राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे. यामुळे राठोड यांना नाहक बदनाम केले जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी भाजपचा निषेध केला आहे.