राज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. त्यांना तातडीने मुंबईच्या लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

विजय शिवतारे यांना आज (सोमवार) दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन वर्षापूर्वीसुद्धा त्यांना हृदयाचा त्रास झाल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी योग्य उपचार करवून घेतले होते.

शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालायात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी शिवसेना नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. शिवसेना नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीविषयी डॉक्टरांकडे विचारपूस केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like