Ministry of Defence | संरक्षण मंत्रालयात 10 वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरीसाठी संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे इयत्ता 10 वी पास आणि काही कलांमध्ये पारंगत अशा उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत (Ministry of Defence) एएससी सेंटर (साऊथ) -2 एटीसीने ग्रुप C च्या विविध पदांसाठी (Group C recruitment) अर्ज मागविले आहेत. त्याअंतर्गत सिव्हिल मोटर ड्रायव्हर (Civil motor driver), क्लिनर (Cleaner), कुक (Cook) आणि सिव्हिलियन इन्स्ट्रक्टर (Civilion instructor) आदी पदासाठी भरती केली जाणार आहे. Ministry of Defence | openings in ministry of defence for 10th passed different posts

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

या पदासाठी अर्ज करतांना उमेदवारांनी आवश्यक सेल्फ अटेस्टेड (self attested) कागदपत्र पोस्टद्वारे पाठवायचे आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख भरतीची अधिसूचना जारी झाल्यानंतर 30 दिवसांची आहे. याची अधिसूचना 12 जून रोजी जारी केली होती. इच्छूक अन् पात्र उमेदवारांनी पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, सीएचक्यू, एएससी सेंटर (दक्षिण) -2 एटीसी, अ‍ॅडव्हान्स पोस्ट, बंगलोर -07 या या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

 

कोणत्या पोस्टसाठी किती जागा

एकूण पदे : 100
1)सिव्हिल मोटर चालक (Civil motor driver)- 42 पोस्ट
2)क्लिनर – (Cleaner) 40 पोस्ट
3)कूक – (Cook) 15 पोस्ट
4) नागरी केटरिंग प्रशिक्षक – (Civilion instructor) 03 पोस्ट

दरमहा वेतन
1) सिव्हिल मोटर चालक – 19900 रुपये
2) क्लिनर – 18000 रुपये
3) कूक – 19900 रुपये
4) सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर – 19900 रुपये

शैक्षणिक पात्रता
सिव्हिल मोटर ड्रायव्हर – हेवी अन् लाइट मोटर वाहन परवान्यासह दहावी पास. 2 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.
क्लिनर – 10 पास अन् संबंधित कामात पारंगत असावे.
कूक – 10 पास आणि स्वयंपाक करण्यात कुशल असावा. 1 वर्षाचा अनुभव असणार्‍या उमेदवारांना प्राधान्य.
सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर – केटरिंगमधील डिप्लोमासह 10 पास. किमान 1 वर्षाचा केटरिंग इन्स्ट्रक्टरचा अनुभव असावा.

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Wab Title :- Ministry of Defence | openings in ministry of defence for 10th passed different posts

हे हि वाचा

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत

‘हे’ 2 खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, गावस्करांनी उघड केले पीचचे रहस्य