डिजिलॉकरशी जोडली जातील ओटीपीआरएमएस प्रमाणपत्र, जाणून घ्या शिक्षण मंत्रालयाच्या निर्णयाने होणार कोणते लाभ

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रमाणपत्रांना डिजिलॉकरशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या या उपक्रमामुळे नोंदणी शुल्क माफ होईल. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी ऑनलाइन शिक्षक विद्यार्थी नोंदणी व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्रांना डिजिलॉकरसोबत जोडण्याची घोषणा केली.

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी हे सुद्धा सांगितले की, यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. निशंक यांनी ट्विट करून सांगितले की – ओटीपीआरएमएस प्रमाणपत्रापर्यंत व्यत्यय रहित संपर्कासाठी शिक्षण मंत्रालयाने प्रमाणपत्रांना डिजिलॉकरशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना जारी करण्यात येणारी प्रमाणपत्र आपोआप डिजिलॉकरमध्ये सुरक्षित केली जातील. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीटीई) च्या वेबसाइटवर जाऊन प्रमाणपत्र पाहता येतील.

 

 

 

 

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की, डिजिलॉकर अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयफोनवर सुद्धा डाऊनलोड करता येऊ शकते. इतकेच नाही तर एनसीटीईकडून जारी ओटीपीआरएमएस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 200 रुपयांचे नोंदणीशुल्क सुद्धा माफ करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, यामुळे मोठा लाभ होईल. सोबतच लोकांना व्यवसायिक सुसूत्रतेसह डिजिटलदृष्ट्या सशक्त बनवण्यात मदत होईल.

डिजिलॉकर अशी प्रणाली आहे, जिथे कागदपत्र डिजिटल फॉर्मेटमध्ये सुरक्षित ठेवली जातात. याचा मोठा फायदा हा सुद्धा आहे की, कुठेही सॉफ्ट कॉपीचा वापर करता येऊ शकतो. या सुविधेचा लाभ मोबाइल फोनद्वारे कुठेही घेता येतो. सीबीएसईकडून सुद्धा सीटीईटी जानेवारी 2021 परीक्षेचे मार्कशीट आणि क्वालिफाईंग सर्टिफिकेट्स डिजिलॉकरवर अपलोड केले जातील. सीटीईटी 2021 मध्ये उत्तीर्ण उमेदवार आपली सर्टिफिकेट आणि मार्कशीट डिजिलॉकरमधून डाऊनलोड करू शकतील.