COVID-19 in India : कोरोनाचा वेग आणखी मंदावला; 24 तासात 1.20 लाख केस, 3380 रूग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा वेग आता आणखी कमजोर होताना दिसत आहे. मात्र अजूनही धोका टळलेला नाही. आरोग्य मंत्रालया ( Ministry of Health ) च्या आकड्यांनुसार देशात मागील 24 तासात कोरोनाच्या 1 लाख 20 हजार 529 नवीन केस सापडल्या आहेत. तर मागील एका दिवसात कोरोनाने 3380 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची नवीन प्रकरणे आल्यानंतर आता देशात एकुण संक्रमित रूग्णांची संख्या 2 कोटी 86 लाख 94 हजार 879 झाली आहे. आरोग्य मंत्रालया (Ministry of Health) नुसार, देशात आतापर्यंत कोरोनाच्या 15 लाख 55 हजार 248 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत, तर 2 कोटी 67 लाख 95 हजार 549 लोक बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाने 3 लाख 44 हजार 82 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरस संसर्गाचे राज्यनिहाय आकडे
महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 14,152 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमितांची एकुण संख्या 58,05,565 झाली. याशिवाय आणखी 289 रूग्णांच्या मृत्यूंसह मृतांची संख्या वाढून 98,771 पर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानुसार राज्यात लागोपाठ पाचव्या दिवशी संसर्गाची 20 हजारपेक्षा कमी प्रकरणे समोर आली आहेत. विभागानुसार राज्यात आणखी 20,852 रूग्ण मुक्त झाल्यानंतर बरे झालेल्या लोकांची एकुण संख्या 55,07,058 झाली आहे. उपचाराधीन रूग्णांची संख्या 1,96,894 आहे.

* गुजरात
नवी प्रकरणे 1,120, मृत्यू 16
* बिहार
नवी प्रकरणे 990, मृत्यू 23

READ ALSO THIS :

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

Corona Third Wave : नीती आयोगने म्हटले – ‘सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, तयार राहण्याची आवश्यकता’

Pune : पीएमपी संचालक राजीनामा नाट्याचा पुढील अंक ‘पोलिस ठाण्यात’ ! भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हल्ला