केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेंशनधाराकांसाठी ‘आरोग्य विमा योजना’, कुटूंबियांना देखील मिळणार ‘लाभ’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय कर्मचारी आणि पेशनधारकांसाठी मोदी सरकार लवकरच आरोग्य विमा योजना आणण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना आणि पेशनधारकांना सरकाराने ठरवून दिलेल्या रुग्णालयांमध्ये स्वता:चे आणि कुटूंबाचे उपचार करत येणार आहेत. या आरोग्य योजनेसाठी आरोग्य मंत्रालयाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला आर्थिक व्यवहार्यतेच्या मंजुरीसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

५ लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत मिळणार
आरोग्य मंत्रालयाने या आरोग्य योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना, पेंशनधारकांना आणि त्यांच्या कुटूंबाला एका वर्षांत ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. असे असेल तरी उपचारादरम्यान लाभार्थ्यांना उपचारासाठी खर्च करावा लागणार आहे. होणारा खर्च लाभार्थ्यांला सरकारकडून परत करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना ८ ते १० हजार वार्षिक प्रिमियम भरावा लागेल. जे कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे अनुसार असेल. या प्रिमियमवर सरकार काही प्रमाणात सब्सिडी देखील देऊ शकते.

यांना मिळणार फायदा
या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना, पेंशनधारकांसह त्यांच्या पत्नीला, दोन मुलांना आणि कर्मचाऱ्यांच्या आई – वडिलांना लाभ मिळणार आहे. यासह या योजनेत कर्मचारी आणि पेंशनधारक त्यांच्यावर विसंबून असलेल्या घरातील इतर सदस्यांचा देखील सहभाग करुन घेऊ शकतात. परंतू यासाठी आधिक प्रिमियम भरावा लागेल. यासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारची सब्सिडी देण्यात येणार नाही. या योजनेचा लाभ १ कोटी पेक्षा आधिक कर्मचारी आणि पेंशनधारकांना होणार आहे.

ओपीडीची लाभ घेता येणार नाही
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ६ व्या वेतन आयोगाने सर्व देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना, पेंशनधारकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना आरोग्य विमा योजनेत सहभागाची शिफारस करण्यात आली होती. आता आरोग्य मंत्रालयाने या नव्या योजनेचा प्रस्ताव तयार केले आहे. नव्या प्रस्तावात या योजनेत ओपीडी अंतर्गत आरोग्य सेवेंचा लाभ मिळणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

Loading...
You might also like