गृहमंत्रालयाकडून केंद्रिय सशस्त्र पोलीस दलाच्या भत्त्यात भरभक्कम वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृहमंत्रालयाकडून केंद्रिय सशस्त्र पोलीस दल (CAPF) कर्मचाऱ्यांसाठी मोठे गिफ़्ट देण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाकडून केंद्रिय सशस्त्र बलातील कर्मचाऱ्यांच्या भात्यात भरभक्कम वाढ करण्यात आली आहे. ही वाढ जोखीम आणि दुर्घटना भत्त्यात ( Risk and Hardship Allowance) करण्यात आली आहे. हा भत्ता आरएच मॅट्रिक्स अंतर्गत देण्यात येतो. यापूर्वी ९७०० रुपये भत्ता सैनिकांना दिला जात होता मात्र आता तो वाढवून १७,३०० रुपये प्रति महिना करण्यात येणार आहे. तसेच निरीक्षक पदापर्यंतच्या आधिकऱ्यांना १६,९०० रुपये जोखीम आणि दुर्घटना भत्ता देण्यात येत होता तो आता वाढवून २५,००० रुपये करण्यात येणार आहे. अशी माहिती एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिली आहे.

जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये सीआरपीएफ दलाच्या वाहनावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. म्हणूनच देशाच्या सीमेवर २४ तास पहारा देणाऱ्या सैनिकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय गृहमंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. जोखीम आणि दुर्घटना भत्ता हा आरआरएच मॅट्रिक्स अंतर्गत देण्यात येतो.

सीआरपीएफ जवानांनाही विमानसेवा

पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने सीआरपीएफ जवानांनाही श्रीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सुरक्षादलाना यापूर्वी जम्मू ते श्रीनगर जो रस्त्याने प्रवास करावा लागत होता तो आता थांबणार आहे. या निर्णयाची सुमारे ७ लाख ८० हजार जवानांना याचा लाभ होणार आहे.