Lockdown : गृह मंत्रालयानं जारी केली नवीन गाईडलाइन, सांगितलं – ‘जे प्रवासी मजूर जिथं आहेत तिथंच थांबा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृह मंत्रालयानं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर चालु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान परराज्यात अडकलेल्या मजुरांसाठी नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. गृह मंत्रालयानं इतर राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशात अडकलेल्या मजुरांच्या जाण्या-येण्यावर स्टॅर्न्डड ऑपरेटिंग सिस्टीम जारी केली आहे. त्यामध्ये मजुरांना तिथं आहात तिथंच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर केंद्र शासित प्रदेश आणि राज्यांच्या बाहेर कोणत्याही परिस्थिती पडू नका असेही सांगण्यात आले आहे.

प्रवासी मजुरांची आता स्थानिक प्रशासनाकडून नोंद केली जाणार असून त्यांना काम उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या कार्यकुशलतेचं परिक्षण करण्यास सांगण्यात आलं आहे. मजुरांची स्क्रीनिंग देखील करण्यात येणार आहे. ज्यांच्यामध्ये कोणतीच लक्षण नाहीत अशांना त्यांच्या कामावर नेण्यात येणार आहे. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात मजुरांना नेता येणार नाही. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. मजुरांच्या प्रवासादरम्यान स्थानिक प्रशासनानं त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करावी.