42 लाख शिक्षकांना मिळणार ‘ट्रेनिंग’, 22 ऑगस्टपासून योजना सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून जगभरातील सर्वात मोठी ऐतिहासिक योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेचे नाव ‘निष्ठा योजना’ असणार आहे. निष्ठा म्हणजेच National Initiative on School Teachers Head Holistic Advancement (NISHTHA). या योजने अंतर्गत ४२ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात सर्व राज्यातील शिक्षकांचा समावेश करण्यात येणार आहे. २२ ऑगस्टला योजनेची सुरुवात होणार आहे.

देशभरातील शिक्षकांना प्रशिक्षणाची योजना
मानव संसाधन विकास मंत्रालयमध्ये शालेय शिक्षा आणि साक्षरता विभागच्या सचिव रीना रे यांनी दिलेल्या माहिती नुसार २२ ऑगस्टला मंत्रालयाने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी जगातील सर्वात मोठी योजना निष्ठा सुरु करण्यात येणार आहे. याअंतर्गत देशभरातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या मोठ्या कार्यक्रमाबद्दल मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले की, भारत पारंपारिक पद्धतीने शिक्षण आणि शिक्षकांच्या निर्माणात नेतृत्व करणाऱ्यांसाठी ओळखला जातो. हजारो वर्षापासून भारतीय शिक्षक विश्व गुरुच्या रुपात मानले जातात. ते म्हणाले की शाळा कोणत्याही विकसनशील देशाचा आधार असतो आणि शिक्षक, समाजातील ऊर्जा केंद्र जे विद्यार्थ्यांचे भविष्य सावरु शकतील आणि त्यांना देशाचा उत्तम नागरिक बनतील.

आरोग्यविषयक वृत्त