Ministry of Indian Railways। प्रवाशांसाठी 50 स्पेशल ट्रेन सुरु होणार, रेल्वे मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली – वृत्तसंस्था – Ministry of Indian Railways । कोरोनाच्या (corona ) दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहेत. अनेक व्यवहार सुरळीत सुरु होताना दिसत आहेत. तसेच अनेक सार्वजनिक सुविधा देखील सुरु होत आहेत.
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने या पार्श्वभूमीवर आता नागरीकांच्या सुविधेसाठी 50 स्पेशल ट्रेन (Special train) सुरु होणार आहे.
कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या रेल्वे (Railways) धावण्यासाठी आता पुन्हा सज्ज झाल्या आहेत.

याबाबत महत्वपूर्ण निर्णय रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) घेतला आहे. तर 21 जून योग दिनामिमित्त स्पेशल ट्रेन (Special train) प्रारंभ करण्यात येणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांनी ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

रेल्वे मंत्री पियुष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांनी मागील आठवड्यामध्ये स्पेशल ट्रेन (Special train) सुरु होणार असल्याचे संकेत दिले होते.
तसेच, नागरिकांच्या आग्राहानंतर रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railways) हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
शताब्दी, दुरंतो आणि अनेक स्पेशल ट्रेन 21 जूनपासून सुरु होणार आहेत.

तसेच, 25 जूनपासून गोरखपूर (उत्तर प्रदेश) ते बांद्रा अशी नवीन ट्रेन (Railways) सुरु होत आहे. नव्यानं सुरु होणाऱ्या रल्वेमध्ये (Railways) अनेक एक्स्प्रेस, मेल आणि सुपरफास्ट रेल्वे (Railways) गाड्यांचा समावेश आहे. रेल्वे विभागाकडून जारी करण्यात आलेल्या यादीनुसार, नवी दिल्ली-कालका शताब्दी, नवी दिल्ली-देहराडून शताब्दी, नवी दिल्ली-अमृतसर शताब्दी, दिल्ली सराय रोहिल्ला-जम्मू तवी दुरंतो, माता वैष्णो देवी कटरा-नवी दिल्ली श्री शक्ती एक्स्प्रेस आणि लखनऊ-प्रयागराज संगम एक्स्प्रेस या रेल्वे (Railways) गाड्यांचा समावेश आहे.
दरम्यान, bit.ly/RestoredTrains या संकेतस्थळावर रेल्वेबाबत (Railways) आणखी माहिती मिळेल. असे सांगितले आहे.

या दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारण 800 मेल आणि एक्स्प्रेस रेल्वे (Railways) सुरु झाल्या होत्या. शुक्रवारी (18 जून) हा आकडा 983 वर पोहचली आहे.
कोरोना संकटात रेल्वेनं अनेक स्पेशल ट्रेन्स (Special train) सुरु केल्या होत्या.
दरम्यान, आगामी काही दिवसांत रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railways) अनेक रेल्वे (Railways) पुन्हा सुरु केल्या जाणार असल्याची माहिती दिली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : ministry of indian railway -। indian railways to resume 50 special train services from june 21

हे देखील वाचा

Pan Card and Aadhaar Card | 30 जूनपूर्वी ‘हे’ काम करणे अनिवार्य अन्यथा बसेल 1 हजाराचा फटका

Ajit Pawar | ‘…तर पुणे, जिल्ह्यातून बाहेर गेलेल्यांना परतल्यास 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल’ – उपमुख्यमंत्री (व्हिडीओ)

pune commissioner amitabh gupta | पुण्यात जबरी चोर्‍या करणार्‍यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Ajit Pawar । …तर पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवार