माहिती व प्रसारण मंत्रालय आता हिंदीतून लावणार ‘गीत रामायण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भाजपला सत्ता मिळाली. त्यानंतर भारतातील वातावरण भगवामय झाले आहे. भाजप रामाचे नाव घेत पुढे सरसावत आहे. राम मंदिर बांधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संतांच्या बाजूने येईपर्यंत सरकारने नवीन धोरण आखले आहे. सरकार आता ‘गीत रामायण’ची हिंदी आवृत्ती आणण्याची तयारी करत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही माहिती मिळत आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून हिंदी आवृत्ती सादर करण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला आहे.

सोमवारी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी या बैठकीत ही निर्णय़ घेण्यात आला. आयुष मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सांस्कृतिक मंत्री गोवा गोविंद गौडा यांनी पत्राच्या माध्यमातून या निर्णयाची माहिती दिली.

गीत रामायण हे मराठी भाषेतील ५६ गाण्यांचे संग्रह आहे. ही गाणी रामायणच्या वेगवेगळ्या भागाचे वर्णन करणारी आहेत. दत्ता प्रसाद जोग यांनी मराठी भाषेतील या गाण्यांचे हिंदीत अनुवाद केले आहेत.

दरम्यान, गीत रामायण हे यापूर्वीही रोडिओवर प्रसारित झाले आहे. ऑल इंडिया रेडिओवर १९५५-५६ मध्ये पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावरून याचे प्रचारण केले जायचे. या वेळी प्रसारित केलेले गीत रामायण गजानन दिगंबर माडगूळकर यांनी लिहिले होते आणि सुधीर फडके यांनी संगीत दिले होते. ही गाणी हिंदीनंतर बंगाली, इंग्रजी, गुजराती, कन्नड, कोकणी, संस्कृत, सिंधी भाषेत अनुवादित केली आहेत. तसंच ते ब्रेल लिपीमध्ये देखील लिहिलेले आहे. त्यावेळी या गाण्यांची मोठ्याप्रमाणात वाहवाही झाली होती.

आरोग्य विषयक वृत्त

इंटरनेटचा अतिरेकी वापर करतो मेंदूच्या ‘या’ क्षमतांवर परिणाम

पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’

दातांवरून जाणून घेता येऊ शकते , तुमचे आरोग्य किती चांगले

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते