मोदी सरकारचा मोठा निर्णय ! PUBG सह इतर 118 मोबाईल अ‍ॅप्सवर IT मंत्रालयाकडून बंदी

वृत्तसंस्था – चीनच्या टीकटॉक आणि इतर तत्सम मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर पुन्हा एकदा मोदी सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. टीकटॉक बॅन केल्यानं चीनला त्याचा मोठा फटका बसला. त्याचवेळी मोदी सरकारनं आपण आणखी काही मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आताच मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या माहिती आणि तंज्ञत्रान मंत्रालयानं पब्जीसह इतर 118 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

टीकटॉकवर बंदी घातल्यानंतर त्याचे मोठे पडसात उमटले होते. आता पब्जीवर बंदी घातल्यानंतर त्याचे देखील पडसाद उमटणार कारण पब्जी हे अ‍ॅप तरूणांमध्ये खुपच लोकप्रिय आहे.