जर नाही मिळालं वेतन (Salary) तर ‘या’ क्रमांकावर करा तक्रार, तात्काळ होईल कारवाई; मोदी सरकारनं बनवले 20 कंट्रोल रूम (Video)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढती प्रकरणे आणि बऱ्याच राज्यात घातलेल्या निर्बंधामुळे कामगार आणि रोजगार मंत्रालयाने एप्रिल २०२० मध्ये स्थापन केलेल्या २० नियंत्रित कक्षांना पुन्हा सुरु केले आहे. मुख्य कामगार आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत विविध राज्य सरकारांशी समन्वय साधून स्थलांतरित कामगारांच्या समस्येचे निराकरण करणे हा यामागील उद्देश आहे. पहिल्या वर्षी लाखो कामगारांनी या सुविधेचा लाभ घेतला आणि त्यांच्या समस्या सोडविल्या गेल्या. मुख्य कामगार आयुक्त दररोज कंट्रोल रूमच्या कामकाजावर लक्ष ठेवतात.

भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची गती वाढत आहे, आदल्या दिवशी कोरोनाचे २,५९,१७० नवीन रुग्ण आढळले, त्यानंतर देशात संक्रमित रुग्णांची संख्या २० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. वाढती कोरोना प्रकरणे आणि त्यामुळे होणाऱ्या मृतांची संख्या पाहता बऱ्याच राज्यांनी अंशतः किंवा पूर्णतः लॉकडाऊन आणि रात्री कर्फ्यू जाहीर केला आहे. राज्यांत शनिवारी आणि रविवारी कर्फ्यू, नाईट कर्फ्यू लागू केले आहेत. अशा परिस्थितीत परप्रांतीय मजुरांचा ताण पुन्हा वाढला आहे. म्हणूनच सरकारने मजुरांच्या मदतीसाठी कंट्रोल रूम तयार केले आहेत.

कोठे आहेत कंट्रोल रूम ?
कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अहमदाबाद, अजमेर, आसनसोल, बेंगलोर, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोची, डेहराडून, दिल्ली, धनबाद, गुवाहाटी, हैद्राबाद, जबलपूर, कानपुर, कोलकता, मुंबई, नागपूर, पटना आणि रायपूर या ठिकाणी हे कक्ष चालू करण्यात आले आहेत.

कंट्रोल रूम मध्ये तक्रार कशी करावी ?
कामगार ई-मेल, मोबाईल आणि व्हॉट्सअप या माध्यमातून कंट्रोल रूम शी संपर्क साधू शकतात. या कक्षाचे व्यवस्थापन हे कामगार प्रवर्तन अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, प्रादेशिक कामगार आयुक्त आणि उपमुख्य कामगार आयुक्त यांच्याकडे आहे. हे नियंत्रण कक्ष संबंधित क्षेत्रातील कामगार माहिती अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, प्रादेशिक कामगार आयुक्त आणि उप कामगार आयुक्त यांच्यामार्फत चालवले जाते. मुख्य कामगार आयुक्त दररोज २० कॉल सेंटरच्या कामगारांवर लक्ष ठेवतील.Wh1

Wh2

Wh3

पुढील क्रमांकावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता

राज्य-शहर                      मोबाईल क्रमांक                      ई-मेल आयडी

अहमदाबाद
गुजरात आणि
केंद्रशासित प्रदेश               ८९४९४००५३३                     [email protected]
दादरा नगर हवेली ,
दमन आणि दिव,

मानीकंदन एन                   ९४८६८५५४७५                     [email protected]

कल्पना सिसोदिया              ९१६६९८८९९९                    [email protected]

फारुख हुसेन शेख               ९९९८०२२८८९                    [email protected]

पवन कुमार                        ९४११४०५७०९                    [email protected]

संजीव वर्मा                        ८२९२६०६११८                    [email protected]

सागर प्रधान                       ९४२२५२४०९६                     [email protected]