आता कागदपत्रांची कटकट नको; गाडीचा नंबर टाका आणि सर्व माहिती मिळवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
परिवहन विभागाने एक असं अॅप तयार केलं आहे , ज्याच्या माध्यमातून तुम्हाला गाडीचा नंबर टाकताच सर्व माहिती मिळेल. या अॅपमुळे जुनी गाडी विकत घेत असताना येणाऱ्या अनेक समस्यांमधून ग्राहकांची सुटका होणार आहेत.

देशभरात परिवहन विभागाने एम परिवहन नवाचं एक नवीन अॅप तयार केलं आहे. यात देशभरातील वाहनांची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. वाहन कोणाच्या मालकीचं आहे, वाहनांवर परिवहन विभागाने काही कारवाई केली आहे का, वाहन डिझेलवर आहे, की पेट्रोलवर अशी संपूर्ण माहिती अॅपवर मिळेल.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’21c45783-c967-11e8-a09f-3dc55557e4dd’]
वाहन चालक परवाना, वाहनांचे कागदपत्र यावरुन पोलीस प्रशासन आणि वाहन चालक यांच्यात नेहमी वाद होत असतात. वाहनचालक कागदपत्र घरी विसरल्यास त्यांना पोलिसांनी पकडल्यास दंड भरावा लागतो. त्यामुळे आता एम परिवहन अॅपद्वारे वाहनांचे कागदपत्र पोलिसांना डिजिटल पद्धतीने दाखवता येणार आहेत. डिजिटल वाहन परवाना मिळण्यासही सुरुवात होणार आहे. तेलंगणा राज्यात डिजिटल वाहन परवान्याची सुविधा अगोदरच सुरु झालेली आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशभरात प्रभावीपणे याची अंमलबजावणी होण्याची आशा आहे.

[amazon_link asins=’B06ZZB71TB,B07GLS2TRR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d4745a0-c967-11e8-92f8-d10afdb645c2′]

एम परिवहन अॅपविषयी –

एम परिवहन हे अॅप परिवहन विभागाकडून तयार करण्यात आलं आहे. या अॅपमध्ये तुम्ही दुचाकी, चार चाकी या वाहनांचा नंबर सर्च केल्यास त्या वाहनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. शिवाय वाहन परवाना नंबर सर्च करुन त्या वाहनाबद्दल आणि त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवता येईल. नवीन वाहन चालकाला वाहन परवाना कशा पद्धतीने मिळवता येईल, याबाबतही या अॅपमध्ये दिलेली आहे .

[amazon_link asins=’B06XFLY878,B01EFRQEFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8731ea82-c967-11e8-b074-09764e56edd9′]

कसे वापरलं एम परिवहनचा अॅप –

गुगल प्ले स्टोअरवरुन एम परिवहन हे अॅप डाऊनलोड करावं लागेल.
अॅप ओपन केल्यानंतर व्हर्च्युअल आरसी आणि व्हर्च्युअल डीएल दोन पर्याय दिसतील.
यानंतर एम परिवहन अॅपचं होम पेज ओपन होईल, सर्च पर्याय निवडून त्यात वाहन नंबर सर्च केल्यावर वाहनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

[amazon_link asins=’B06XCJFWHJ,B07GL2SGMV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e4f7a7e4-c967-11e8-ba19-837b30292e09′]