धक्कादायक ! डोक्यात वीटा घातल्या अन् डोळयांमध्ये काडया खुपसल्या, अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या

 पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे लॉकडाउन असून ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा असतानाही जळगावात अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. डांभुर्णी येथे मुलाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन दिवसांपुर्वी मुलगा घरातून बेपत्ता झाला होता. यानंतर एका शेतात मुलाचा मृतदेह आढळून आला. हा मुलगा 2 एप्रिल रोजी घरातून बेपत्ता झाला होता. यानंतर कुटुंबाने त्याचा शोध सुरु केला होता. दुसर्‍या दिवशी एका शेतात मुलाचा मृतदेह आढळला.

अत्यंत निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात आली होती. त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये मारेकर्‍यांनी काड्या खुपसल्या होत्या. तसेच डोक्यात विटेने मारहाण करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित मुलाची इतकी निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like