बिबवेवाडीतून अल्पवयीन मुलगा बेपत्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –बिबवेवाडीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे. हा मुलगा ७ डिसेंबर पासून बेपत्ता झाला.
विनोद लालचंद व्यास (वय १७, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी विनोदचा भाऊ मनोज लालचंद व्यास याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विनोद शुक्रवारी (दि.७) पासून घरातून बेपत्ता झाला आहे. मनोज व्यास आणि त्यांच्या बहिणीने त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. शेजारी चौकशी केली असता तो शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास एका दुचाकीस्वाराबरोबर निघून गेला असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र सापडला नसल्याने शनिवारी (दि.९) त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली.

विनोद व्यास याची उंची ५ फुट ४ इंच, रंग सावळा, मध्यम बांधा, उभा चेहरा, सरळ नाक, नेसणीस निळ्या रंगाचा फुल शर्ट, आणि जिन्स पॅंट असून त्याला मराठी, हिंदी भाषा बोलता येते. या वर्णनाचा तरुण आढळल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.