सोसायटीत अल्पवयीन मुलांचा राडा ; एकावर कोयत्याने सपासप वार

तीन अल्पवयीन मुले पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोसायटीच्या आवारात गोधळ घालणाऱ्या एका मुलाला मारल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने आपल्या साथिदारांना बोलावून सोसायटीतील एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले. ही घटना नवी पेठेतील तारांकित अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री आठच्या सुमरास घडली.

यामध्ये सुनिल कोंढाळकर (वय-४५) गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सनिल कोंढाळकर यांच्या पत्नी अश्विनी कोंढाळकर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कोंढाळकर यांच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुले आणि जखमी कोंढाळकर हे एकाच सोसायटीत राहणारे आहेत. मुलांनी शाळा सोडून दिली असून ते परिसरात टवाळकी करत फिरत असतात. तसेच सोसायटीत गोंधळ घालत असतात. त्यामुळे कोंढाळकर यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाला समज देऊन चापट मारली होती. तेव्हापासून त्या मुलाचे मित्र कोंढाळकर यांच्यावर चिडून होते.

रविवारी रात्री आठच्या सुमरास कोंढाळकर सोसायटीच्या आवारातून जात होते. त्यावेळी अल्पवयीन मुलगा आपल्या साथिदारासह त्या ठिकाणी आला. त्यांनी कोंढाळकर यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवत सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कोंढाळकर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक नितीन म्हस्के करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय

या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी

जाणून घ्या – मूत्रपिंड विकाराची लक्षणे

‘या’ कारणांमुळे हाताच्या बोटांना येते सूज