प्रियकराबरोबर जाण्यासाठी ‘हट्ट’ करत होती ‘प्रियसी’, परंतुत्याच्या उत्तरानं सगळेच ‘अवाक्’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – सोमवारी प्रियकरासोबत गेलेल्या प्रियसीला राया पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अलीगढमधून ताब्यात घेतले. तरुणीला तिच्या नातेवाईकांकडे सोपावण्यात आले आहे. परंतु बुधवारी घरातून निघालेली तरुणी पुन्हा एकदा मोबाईल घेऊन पळून गेली. नातेवाईक शोध घेत होते आणि स्वत: तरुणीने 112 वर संपर्क करुन मारहाण झाल्याची माहिती दिली. पीआरव्ही तरुणीना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तरुणी प्रियकराबरोबर जाण्यासाठी अडून राहिली. परंतु आता प्रियकर तिला घेऊन जाण्यासाठी तयार नव्हता. रात्रीपर्यंत पोलीस तरुणीला समजवण्याचा प्रयत्न करत होते.

राया पोलीस स्टेशन परिसरातील एक तरुणी आपल्या प्रियकराबरोबर निघून गेली होती. नातेवाईक तरुणीचा शोध घेत होते. सोमवारी पोलिसांनी तरुणीला अलीगडमधून ताब्यात घेतले. आणि नातेवाईकांना सोपवाले. त्यानंतर तरुणीने बुधवारी 112 नंबरवर कॉल करुन मारहाण झाल्याची सूचना दिली. त्यानंतर तरुणी घरातून बाहेर गेली. पीआरव्हीने तिचा शोध घेतला आणि तिला घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले. तिला नातेवाईकींकडून पोलिसांकडून समजवून सांगण्याचा प्रयत्न केला गेला परंतु ती हट्ट धरुन बसली होती की तिला प्रियकरासोबत जायचे आहे.

अखेर प्रियकराने तिला घेऊन जाण्यास नकार दिला. परंतु तरुणी घरी जाण्यास तयार नव्हती. पोलीस निरिक्षक चतर सिंह राजौरा यांनी सांगितले की तरुणीला समजवण्याचा पोलिसांकडून नातेवाईकांकडून प्रयत्न सुरु आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/