संतापजनक ! अल्पवयीन मुलीचं अपहरण, नराधमांकडून सामूहिक बलात्कार

पटना : वृत्तसंस्था – आज काल महिलांवरचे अत्याचार कितीतरी प्रमाणात वाढले आहेत. लहान मुली असोत की महिला या सर्वच जण या वासनेच्या अत्याचाराला बळी पडत आहेत. असाच एक प्रकार बिहार मधील पटना येथे घडला आहे. कोचिंग क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य तीन जणांचा शोध सुरु आहे.

बलात्कार झालेली पीडित मुलगी इयत्ता सातवीत शिकते. क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली असता, ४ जणांनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. खूप वेळ झाला तरीही मुलगी अजून घरी परतली नसल्यामुळे तिच्या, पालकांनी तिचा शोध सुरु केला व थोड्या वेळाने त्यांना ती एका गार्डनमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली. शुद्धीवर आल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला.

या घटनेतील ४ आरोपींचा शोध सुरु असून पोलिसांना यश आले आहे. त्या एका आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अन्य तीन जणांचा शोध सुरु आहे. या अशा प्रकारामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून, पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करण्यात येत आहेत.