टेबल टेनिस प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन

मुलींवर होणाऱ्या आत्याच्याराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शाळा, महाविद्यालयात मुलींवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना वाढत असतानाच टेनिस प्रशिक्षकाकडून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.५) सायंकाळी उघडकीस आली आहे. सहा वर्षांपासून टेबल टेनिसचे धडे घेण्यासाठी जाणाऱ्या बारा वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36da79da-c959-11e8-9460-5b14eaf656a3′]

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बारा वर्षीय मुलगी सहा वर्षांपासून राऊतवाडीतील टेबल टेनिस शिकविणारा महेंद्र कोठारी याच्याकडे जायची. गत महिनाभरापासून प्रशिक्षक महेंद्र कोठारी (५0) हा मुलीवर वाईट नजर टाकून होता. संधी मिळेल तेव्हा तो या मुलीसोबत अश्लील चाळे करायचा. तिच्या सर्वांगावर वाईट उद्देशाने स्पर्श करायचा; परंतु ही बाब मुलीने घरी सांगितली नाही. प्रशिक्षकाच्या वर्तणुकीमुळे मुलीच्या मनावर विपरीत परिणाम झाला. ती घरी फारशी कोणाशी बोलायची नाही. सातत्याने चिडचिड करायची. हे तिच्या आईच्या लक्षात आल्यावर, तिने मुलीला विश्वासात घेतले आणि तिला विचारणा केली. तेव्हा मुलीने आपबिती कथन केली. प्रशिक्षकाकडून होत असलेला अत्याचार पाहून, आईला धक्काच बसला.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f5298f8-c959-11e8-9ef6-3f680a9e608c’]

आईने मुलीला सोबत घेऊन शुक्रवारी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठले आणि टेबल टेनिस प्रशिक्षक महेंद्र कोठारी याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी महेंद्र कोठारी याला अटक केली.

शहरातून तीन मुलांसह मुलगी बेपत्ता

नाशिक : शहरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली असून, शुक्रवारी (दि. ५) तीन मुले व एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. नाशिकरोड, इंदिरानगर व पंचवटी परिसरात या घटना घडल्या असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकरोडच्या पंचक परिसरातील विद्यालयात शिक्षण घेत असलेले सोळा वर्षीय दोन मित्र बेपत्ता झाले आहेत. आडगाव व गंगापूर कॅनॉल परिसरातील ही मुले असून, गुरुवारी (दि. ४) दुपारी १२ ते ४ या कालावधीत शाळेत असताना या दोघांनी ‘आई आजारी आहे’, असे सांगून शाळेतून निघून गेले; मात्र घरी परतले नाही. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.