इंदापूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन 15 वर्षीय शाळकरी मुलीचा खून

पुणे/इंदापूर : पोलसीनामा ऑनलाइन – मुलासोबत बोलत असल्याचे पाहिल्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत आईच्या प्रियकराने 15 वर्षीय शाळकरी मुलीचा निर्घृण खून केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे घडली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास गावाजवळील वनविभागाच्या झाडीत नेले. त्याठिकाणी तिचे हातपाय एका झाडाला बांधून अगोदर तिचे पाय तोडले त्यानंतर तिच्या डोक्यात लाकडी दांडुक्याने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अश्विनी हनुमंत पोटफोडे (वय-15) असे खून करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी गणेश उर्फ समीर हनुमंत खरात याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी गणेश खरात फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी आणि तिची आई मालन पोटफोडे या दोघी मागील बारा वर्षापासून निमसाखर येथे राहतात. मालन यांचे पती हनुमंत पोटफोडे हे या माय लेकीचा सांभाळ करत नसल्याने त्या दोघी गणेश खऱात याच्याकडे राहतात.

सोमवारी अश्विनी गावातील एका मुलासोबत बोलत असल्याचे गणेश खरात याने पाहिले. त्यामुळे संतापलेल्या गणेशने रात्री साडे आठच्या सुमारास अश्विनी आणि मालन या दोघींना गावाजवळ असलेल्या वनविभागाच्या झाडीत घेऊन गेला. त्याठिकाणी अश्विनीला झाडाला बांधून तिचे पाय मोडले, नंतर तिच्या डोक्यात लिंबाच्या काठीने जबर मारहाण केली. तिला सोडवण्यासाठी गेलेल्या तिच्या आईला देखील आरोपी गणेशने बेदम मारहाण करून तेथून पळून गेला.

जखमी झालेल्या अश्विनीला वालचंदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. वालचंदनगर पोलिसांनी गणेश खरात याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –