संतापजनक ! गालाचे ‘लचके’ घेत डोके आपटून 2.5 वर्षाचा मुलीचा खून करणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वडील आणि मामा सोबत झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी आईच्या कुशीत झोपलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेत तिचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका विकृताला अटक केली असून त्याने मृत मुलीला अनेक ठिकाणी चावा घेतला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रथमेश बाबू गायकवाड (वय-१९ रा. पुणे स्टेशन) असे अटक करण्यात आलेल्या विकृत आरोपीचे नाव आहे. तर पूनम राणा असे खून झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. पुनम मंगळवारी रात्री रेल्वे रुग्णालयाच्या बाहेर पादचारी मार्गावर आईच्या कुशीत झोपली होती. आरोपीने रात्री अडीचच्या सुमारास तिला उचलून नेले. तिच्या गालाचा चावा घेत तिचे डोके आदळल्याने ती गंभीर जखमी झाली. डेमू रेल्वेत कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेले असता पूनम गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिला त्वरीत लोहमार्ग पोलिसांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु करण्यात आला. पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसराती ५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संशयित प्रथमेश पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला ताडीवाला रस्ता येथून ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दहीहंडीच्या दिवशी पूनमच्या वडीलांनी प्रथमेशला मारहाण केली होती. याचा बदला घेण्यासाठी त्याने पूनमचा खून केल्याचा धक्कादायक खुलासा केला.

आरोग्यविषयक वृत्त –